Join us  

IPL 2019 : मुंबईकडून पराभूत झाल्यावर भडकला धोनी, सांगितले पराभवाचे कारण...

या सामन्यानंतर धोनी संघावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 5:12 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल म्हटले जाते. पण मंगळवारी धोनी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनेचेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यानंतर धोनी संघावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यानंतर धोनी संघातील फलंदाजांवर चांगलाच भडकला होता. सामन्यानंतर धोनी म्हणाला की, " या सामन्यात काही गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नाहीत. खासकरून आमची फलंदाजी चांगली झाली नाही. हा सामना आमच्या घरच्या मैदानात होता. यापूर्वी या मैदानात आम्ही बरेच सामने खेळले आहोत. त्यामुळे आम्हाला खेळपट्टी कशी आहे, हे माहिती होते. त्यामुळे फलंदाजांनी जर जास्त धावा केल्या असत्या तर ते आमच्या फायद्याचे ठरले असते. फलंदाजांनी चुकीचे फटके मारल्यामुळेच आमच्या जास्त धावा होऊ शकल्या नाहीत. "

धोनी पुढे म्हणाला की, " या संघातील खेळाडूंनीच आम्हाला विजय मिळवून दिले आहेत. पण मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना परिस्थितीचा योग्य अंदाच घेता आला नाही. जर फलंदाजांनी परिस्थिती चांगली हाताळली असती तर आमच्या जास्त धावा होू शकल्या असत्या."

चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले आणि सामना सहा विकेट्स राखून जिंकला

चेन्नईच्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर सूर्यकुमार आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला.चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. चेन्नईने आपले पहिले तीन फलंदाज फक्त 32 धावांमध्ये गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. विजय यावेळी 26 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स