Join us  

IPL 2019: मलिंगाने मिळवून दिला मुंबई इंडियन्सला विजय, नोंदवला 11 वर्षांतील खास विक्रम  

IPL 2019: लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:49 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी पराभूत केले. मलिंगाने या सामन्यात 4 षटकांत 37 धावा देत 4 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 109 धावांत तंबूत परतला. मलिंगाने शेन वॉटसन ( 8), ड्वेन ब्राव्हो ( 20), मिशेल सँटनर ( 22) आणि हरभजन सिंग ( 1) यांना बाद केले. 

रोहित शर्मा आमि इव्हान लुईस यांनी संयमी खेळ करताना अनुक्रमे 67 व 32 धावा केल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 155 धावा केल्या. हार्दिक पांड्याने नाबाद 23 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नईकडून मुरली विजय ( 38) आणि मिचेल सँटनर (22) हे वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. लसिथ मलिंगाने सर्वाधिक चार विकेट घेत चेन्नईला धक्के दिले. त्याल जसप्रीत बुमराह व कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली.

मलिंगाने या सामन्यात चार विकेट घेत 11 वर्षांतील खास विक्रमाची नोंद केली. त्याने आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नावावर केला. चेन्नईविरुद्ध त्याने आतापर्यंत 30 विकेट घेतल्या आहेत. त्याने उमेश यादवचा विक्रमाला मागे टाकले. यादवने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 29 विकेट घेतल्या आहेत. या विक्रमात चेन्नईच्या ब्राव्हो तिसऱ्या स्थानी आहे आणि त्याने मुंबईविरुद्ध 28 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही मलिंगाच्या नावावर आहे.  त्याने 117 सामन्यांत 19.06च्या सरासरीनं 166 विकेट घेतल्या. या विक्रमात अमित मिश्रा ( 150) आणि पियूष चावला ( 149) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. या शिवाय एका सामन्यात सर्वाधिक वेळा चार विकेट घेण्याच्या सुनील नरीनच्या विक्रमाशी बरोबरी केली. मलिंगा आणि नरीन यांनी 7 वेळा एका सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत.

(IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत हिटमॅन रोहितनं केलं मोठं विधान)

टॅग्स :लसिथ मलिंगाआयपीएल 2019मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा