हैदराबाद, आयपीएल 2019 : : डेव्हिड वॉर्नरची भन्नाट खेळी आणि गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यामुळे सनरायर्स हैदराबादला किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवता आला. या विजयासह हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. हैदराबादने हा सामना 45 धावांनी जिंकला. लोकेश राहुलने पंजाबचा एकहाती किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राहुलने 56 चेंडूंत 79 धावांची खेळी साकारली.
11:48 PM
हैराबादचा 45 धावांनी पंजाबवर विजय
11:44 PM
पंजाबला आठवा धक्का
11:44 PM
हैदराबादला सातवा धक्का
11:43 PM
अर्धशतकवीर लोकेश राहुल आऊट
11:11 PM
सलामीवीर राहुलचे अर्धशतक
11:07 PM
पंजाबला चौथा धक्का
10:59 PM
पंजाबला तिसरा धक्का
निकोलस पुरनच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का बसला. पुरनला 21 धावा करता आल्या.
10:13 PM
हैदराबादला पहिला धक्का
ख्रिस गेलला खलील अहमदने मनीष पांडेकरवी झेलबाद केले. गेलला यावेळी चार धावा करता आल्या.
09:56 PM
हैदराबादचे पंजाबपुढे 213 धावांचे आव्हान
09:19 PM
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आऊट
09:14 PM
हैदराबादला दुसरा धक्का
मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. मनीषने 25 चेंडूंत 36 धावा केल्या.
08:59 PM
सलामीवीर वॉर्नरची हाफ सेंच्युरी
08:36 PM
वृद्धिमान साहा आऊट
वृद्धिमान साहाच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. साहाने 13 चेंडूंत 28 धावा केल्या.
08:24 PM
वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतकी सलामी
08:21 PM
वॉर्नर आणि साहा यांची दमदार सलामी
वॉर्नर आणि साहा यांनी दमदार फटकेबाजी करत चौथ्या षटकातच संघाचे अर्धशतक पूर्ण केले.
08:09 PM
... असा झाला टॉस, पाहा व्हिडीओ
07:38 PM
पंजाबने नाणेफेक जिंकली
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.