कोलकाता, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नो बॉल प्रकरण ताजे असताना शुक्रवारी पुन्हा एकदा सुमार पंचगिरी पाहायला मिळाली. कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात आंद्रे रसेलने तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/168417
जो डेन्लीला पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने बाद करताना कोलकाताला पहिला धक्का दिला. सुरुवातीच्या धक्क्यानंतर रॉबीन उथप्पा व शुबमन गिल यांनी कोलकाताला सावरले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला 1 बाद 41 असा समाधानकारक पल्ला गाठून दिला. मात्र, 9व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उथप्पाला बाद करण्यात कागिसो रबाडाला यश मिळाले. त्याने टाकलेल्या बाउंसरवर फटका मारण्याच्या नादात उथप्पा यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात झेल देत माघारी परतला. उथप्पाने 30 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 30 धावा केल्या. दहा षटकांत कोलकाताने 2 बाद 72 धावा केल्या होत्या.
शुबमनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आघाडीवर येऊन फलंदाजी करण्याची मिळालेली संधी त्याने हेरली आणि दमदार अर्धशतक झळकावत संघाचा धावफलक हलता ठेवला. नितीश राणाने पुढच्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला, पण त्यानंतर ख्रिस मॉरिसने त्याचा त्रिफळा उडवला. तो 11 धावा करून तंबूत परतला. शुबमनचा झंझावात किमो पॉलने रोखला. शुबमनने 39 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या. कोलकाताने 15 षटकांत 4 बाद 122 धावा केल्या होत्या. रबाडाने दिल्लीला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. त्यानंतर आंद्रे रसेलने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र, 17 व्या षटकाच्या ख्रिस मॉरिसच्या पाचव्या चेंडूवर फुल टॉसवर रसेलने षटकार खेचला. तो चेंडू नो बॉल असल्याचा दावा करत रसेलने पंचांच्या दिशेने नाराजी प्रकट केली.