Join us

IPL 2019 KKR vs RCB : पार्थिव पटेलची झेल पकडताना नितीश राणाची कसरत, Video

IPL 2019 KKR vs RCB : बंगळुरुला 18 धावांवर पहिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:40 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : आठपैकी सात सामने गमवणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरूला (आरसीबी) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध (केकेआर) शुक्रवारी आयपीएलमध्ये स्थान टिकवण्यासाठी ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागणार आहे. या सामन्यात सावध सुरुवातीनंतर 18 धावांवर असताना बंगळुरूला पहिला धक्का बसला. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर नितीश राणाने झेल टिपला आणि पटेलला माघारी जावे लागले. राणाला हा झेल पकडताना तारेवरची कसरत करावी लागली.सावध सुरुवातीनंतर बंगळुरूला पहिला धक्का बसला. सलामीवीर पार्थिव पटेल 11 धावांवर बाद झाला. सुनील नरीनने त्याला नितीश राणाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. नरीनच्या आधीच्या षटकात विराट कोहली विरोधात पायचीतची अपील करण्यात आली होती. त्यासाठी कोलकाताने DRSही घेतला, परंतु सुदैवाने कोहली बचावला. अक्षदीप नाथला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत कोहलीनं पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.

पाहा व्हिडीओ...https://www.iplt20.com/video/173585/rana-s-bobble-wobble-catch 

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स