IPL 2019 KKR vs DC : रिषभ पंतचा हा सुपरडुपर कॅच पाहिलात का? Video
कोलकाता, आयपीएल 2019 : पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर पकड निर्माण करेल असे वाटले होते. मात्र, कोलकाता नाइट रायडर्सच्या रॉबीन उथप्पा आणि शुबमन गिल यांनी सुरेख फटकेबाजी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना कोलकाताचा डाव सावरला. पण, नवव्या षटकात उथप्पा बाद झाला. दिल्लीचा यष्टिरक्षक रिषभ पंतने सुपरडुपर कॅच घेत उथप्पाला माघारी पाठवले.
जो डेन्लीला पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने बाद करताना कोलकाताला पहिला धक्का दिला. सुरुवातीच्या धक्क्यानंतर रॉबीन उथप्पा व शुबमन गिल यांनी कोलकाताला सावरले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला 1 बाद 41 असा समाधानकारक पल्ला गाठून दिला. मात्र, 9व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उथप्पाला बाद करण्यात कागिसो रबाडाला यश मिळाले. त्याने टाकलेल्या बाउंसरवर फटका मारण्याच्या नादात उथप्पा यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात झेल देत माघारी परतला. उथप्पाने 30 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 30 धावा केल्या. दहा षटकांत कोलकाताने 2 बाद 72 धावा केल्या होत्या.