Join us

IPL 2019 : थरारक लढतीत KKRच्या पराभवानंतर 'ती' लागली ढसाढसा रडू , Video

IPL 2019 : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 19:08 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीच्या जोरावर कोलकाताने 175 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग राजस्थानने तीन विकेट्स राखून केला. रियान पराग आणि जेफ्रो आर्चर यांनी साकारलेल्या उपयुक्त खेळींच्या जोरावर राजस्थानने हा विजय साकारला. परागने 31 चेंडूंत 47 धावा केल्या, तर आर्चरने 12 चेंडूंत नाबाद 27 धावांची खेळी साकारली.  

कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याला राजस्थानपुढे आव्हानात्मक धावसंख्या ठेवता आली. कार्तिकने 50 चेंडूंत नाबाद 97 धावांची खेळी साकारली. पण, त्याच्या खेळीनंतरही कोलकाताला विजय मिळण्यात अपयश आले. आर्चरने  खणखणीत षटकार खेचून राजस्थानला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर कोलकाताची चिअरलीडर ढसाढसा रडू लागली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स