Join us  

IPL 2019 : अखेरच्या षटकात पंजाबचा हैदराबादवर विजय

लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 11:30 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबनेसनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवला. अखेरच्या षटकामध्ये पंजाबला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज होती आणि पंजाबने सहा विकेट्स व एक चेंडू राखून हा सामना जिंकला.

डेव्हिड वॉर्नरच्या दमदार खेळीच्या जोरावर हैदराबादला प्रथम फलंदाजी करताना 150 धावा करता आल्या. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादला पंजाबपुढे 151 धावांचे आव्हान ठेवता आले. वॉर्नरने यावेळी 62 चेंडूंत नाबाद 70 धावांची खेळी साकारली.

हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची आक्रमक सुरुवात झाली. पण ख्रिस गेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. गेलने 14 चेंडूंत 16 धावा केल्या. गेल बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोघांनीही अर्धशतक झळकावत संघाचा विजय सुकर केला. मयांकने 55 धावांची खेळी साकारत राहुलला चांगली साथ दिली.

टॅग्स :किंग्ज इलेव्हन पंजाबलोकेश राहुलसनरायझर्स हैदराबादआयपीएल 2019