Join us

IPL 2019 : कागिसो रबाडा होऊ शकतो आयपीएलमधून आऊट

यापुढील रबाडाबाबतचा निर्णय  दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ घेणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 17:48 IST

Open in App

चेन्नई, आयपीएल २०१९ : दिल्ली कॅपिटल्स संघाताला काही दिवसांमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलमधला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला कागिसो रबाडा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे यापुढे तो आयपीएलमधून आऊट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रबाडा काही दिवसांपूर्वी पाठित दुखत होते. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार आणि चाचणी करण्यात आली. या चाचणीचे अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला पाठवले आहेत. त्यामुळे यापुढील रबाडाबाबतचा निर्णय  दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ घेणार आहे.

सध्याच्या घडीला रबाडाकडे आयपीएलमधील पर्पल कॅप आहे. रबाडाने १२ सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिव विकेट्स मिळवण्याचा मान रबाडाला मिळाला आहे. रबाडानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा इम्रान ताहिर आहे. ताहिरने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये २१ विकेट्स मिळवल्या आहेत.

रबाडाबाबत दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, " काही दिवसांपूर्वी रबाडा आपण फिट नसल्याचे वाटत होते. त्यानंतर त्याची पाठ दुखायला लागली. त्यानंतर त्यावर काही उपचार करण्यात आले आणि वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे आणि विश्वचषकासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही रबाडाचे वैद्यकीय अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला पाठवले आहेत. आता रबाडाबाबतचा अंतिम निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाच्या हाती असेल."

टॅग्स :आयपीएल 2019दिल्ली कॅपिटल्स