Join us  

IPL 2019 : ... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेल, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही

गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 9:13 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्याख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली. पण ख्रिस गेलचा झेल जो यावेळी पकडला तो तुम्ही कधीही पाहिला नसेल. गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.

 

बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही गेलने मोठा फटका मारला. पण हा चेंडू सीमारेषेजवळ असलेल्या कॉलिन इन्ग्रामने पकडला. पण चेंडू पकडल्यावर त्याला तोल जात होता. आपला तोल जातोय हे कॉलिनला समजले. त्यावेळी त्याने आपल्या जवळ कोणी क्षेत्ररक्षण आहे का, हे पाहिले. त्यावेळी अक्षर पटेल कॉलिनच्या जवळ होता. त्यावेळी कॉलिनने हा चेंडूं थेट अक्षरच्या हातामध्ये फेकला आणि गेल बाद झाला.

गेल आऊट आहे कि नाही, हे मैदानावरील पंचांनाही ठरवता येत नव्हते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहिली आणि अखेर गेल बाद असल्याचा निर्णय दिला.

टॅग्स :ख्रिस गेलकिंग्ज इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्सआयपीएल 2019