Join us  

IPL 2019 : खूशखबर! मुंबई इंडियन्सचे सामने मुंबईतच, जाणून घ्या वेळापत्रक

IPL 2019: लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सहभागी संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:30 PM

Open in App

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सहभागी संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचे सामने ही तारेवरची कसरत पार करण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यश आले आहे. त्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या साखळी फेरीच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमात  सात सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचेही सामने वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सामने मुंबई बाहेर खेळवले जातील या प्रश्नावर मुंबई इंडियन्सचा झहीर खान म्हणाला की,''सुरक्षा यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेत सामन्यांचे ठिकाण ठरवण्यात येईल. मुंबईच्या मैदानावर खेळायला आम्हाला नक्की आवडेल, परंतु हे सामने कुठेही झाले तरी आम्ही खेळण्यास सज्ज आहोत. पण, आशा करतो की सामने मुंबईत व्हावेत.'' झहीरची प्रार्थना बीसीसीआयनं ऐकली आणि मुंबईला घरच्या मैदानावरच खेळावे लागणार आहे. बीसीसीआयने मुंबईत सामने कधी?24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई 13 एप्रिल :  मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई

 

मुंबईबाहेरील सामने28 मार्च :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली6 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली20 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई28 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता 

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएलभारतीय हवाई दल