Join us  

IPL 2019 : खचलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला गौतम गंभीरची साथ 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 5:25 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. 10 सामन्यांत केवळ चार विजयांसह KKR संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या हंगामात त्यांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. त्यामुळे कोलकाता संघाचे मनोबल खचले आहे, परंतु त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता KKRचा  माजी कर्णधार गौतम गंभीर धावला आहे. भारतीय संघाच्या माजी खेळाडूने सोशल मीडियावर KKR साठी विशेष मॅसेज पाठवला आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएलची दोन जेतेपदं नावावर केली. मात्र, सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या गंभीरला संघाने बाहेर केले. तरीही गंभीरनं KKRला मनातून दूर केलेले नाही. संघाची अवस्था पाहून त्याने खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कोलकाताचे आणखी चार सामने शिल्लक आहेत आणि त्यात दमदार कामगिरी करून विजय मिळवा, असा सल्ला गंभीरने दिला आहे. गंभीरने यावेळी कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. 

कोलकाताने गंभीरच्या नेतृत्वाखाली दुसरे जेतेपद पटकावले त्या हंगामात संघाची वाटचाल अडखळत झाली होती. त्यांनी सात सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवले होते. मात्र, त्यानंतर संघाने जोरदार पुनरागमन केले आणि विजयाचा चषक उंचावला.  

टॅग्स :आयपीएल 2019गौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्सदिनेश कार्तिक