Join us

IPL 2019 : भारताच्या माजी प्रशिक्षकाला आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी अटक

यावेळी प्रशिक्षकांबरोबर अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:10 IST

Open in App

मोहाली, आयपीएल २०१९ : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये सट्टेबाजी करताना बडोदा पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी प्रशिक्षकांबरोबर अठरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर काही मोबाईल आणि गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

तुषार आरोठेने भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद भुषवले होते. आरोठेला आज आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे.

महिला संघाचे प्रशिक्षकपद भूषवताना आरोठे आणि खेळाडूंमध्ये मतभेद झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले होते. काही महिला खेळाडूंनी आरोठेंविरोधात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आरोठेंच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला स्वतंत्र निर्णय घेता येत नसल्याची तक्रार खेळाडूंनी केली होती.

बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठेकडे याआधी महिला संघाचे प्रशिक्षकपद होते. मात्र, संघातील खेळाडू त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत्या. त्याची दखल घेऊन बीसीसीआयनं आरोठे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं बोललं जातं. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं. ती जागा आता पोवार घेणार आहे. 

तुषार आरोठेने वादग्रस्त पद्धतीने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले पोवार यांना या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विश्वचषक स्पर्धेनंतर आरोठे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमधील मतभेद वाढले होते. त्यामुळे आरोठे यांना प्रशिक्षकपद सोडावे लागल्यानंतर बीसीसीआयकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते.

टॅग्स :आयपीएल 2019