Join us

IPL 2019 : फॅफ ड्यू प्लेसिसचा अप्रतिम झेल पाहिलात का? Video

IPL 2019: इम्रान ताहीरने एकाच षटकात कोलकाताच्या नितीश राणा व रॉबीन उथप्पाला बाद करून चेन्नई सुपर किंग्सला मोठे यश मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 17:02 IST

Open in App

IPL 2019 : ख्रिस लीनच्या फटकेबाजीच्या जोरावर असलेल्या फ्रंटसिटवर विराजमान असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला इम्रान ताहीरने बॅक फुटवर पाठवले. ताहीरने एकाच षटकात कोलकाताच्या नितीश राणा व रॉबीन उथप्पाला बाद करून चेन्नई सुपर किंग्सला मोठे यश मिळवून दिले. उथप्पाचा अश्यक्य वाटणारा झेल चेन्नईच्या फॅफ ड्यु प्लेसिसने टिपला आणि कोलकाताचे चाहते स्तब्ध राहिले.

ख्रिस लीनने कोलकाता नाइट रायडर्सकडून 1000 धावा करण्याचा विक्रम केला. त्याने पहिली धाव घेताच हा पल्ला पार केला. लीनने चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरच्या दोन षटकांत 22 धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मिचेल सँटनरला गोलंदाजीला आणले. आयपीएलच्या या सत्रात प्रथमच चहरला सलग तीन षटके टाकता आली नाही. सँटनरने कोलकाताच्या सुनील नरीनला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. नरीन 2 धावांवर माघारी परतला. कोलकाताला पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा करता आल्या. त्यात लीनच्या 38 धावा होत्या. लीनने फटकेबाजी करताना 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताने 10 षटकांत 1 बाद 77 धावा केल्या. नितीश राणा 11व्या षटकात तंबूत परतला, त्याला इम्रान ताहीरने बाद केले. राणाने 18 चेंडूंत तीन चौकारांसह 21 धावा केल्या. त्यानंतर आलेला रॉबीन उथप्पाही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यावेळेही फॅफ ड्यू प्लेसिसने उथप्पाचा झेल टिपला. 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स