Join us

IPL 2019: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक

या सट्टेबाजांकडून शंभर सट्टा लावणाऱ्या व्यक्तींची यादीही पोलीसांना सापडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:59 IST

Open in App

इंदूर, आयपीएल 2019 : आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना आज अटक करण्यात आली आहे. या पाच जणांकडे 20 मोबाईल फोन्स, दोन लॅपटॉप, कॅलक्युलेटर आणि दोन रजिस्टर होते. या साऱ्या गोष्टी पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या सट्टेबाजांकडून शंभर सट्टा लावणाऱ्या व्यक्तींची यादीही पोलीसांना सापडली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना मध्य प्रदेश येथील इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. 

येथील पोलीस अधिक्षक अवधेश कुमार गोस्वामी यांनी सांगितले की, " चिकित्सक नगर येथे उभ्या असलेल्या एका कारची तपासणी घेण्यात आली. त्यावेळी या कारमध्ये पाच व्यक्ती सट्टा लावत असल्याचे आम्हाला समजले. या पाचपैकी दोन आरोपी रतलाम येथील आहेत, तर अन्य तीन इंदूर येथील आहेत." 

टॅग्स :आयपीएल 2019