IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्ट

यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 20:26 IST2019-05-04T20:26:06+5:302019-05-04T20:26:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019: For the first time in this year's IPL, Kohli was the first time Lucky, the 'thing' happened | IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्ट

IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्ट

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण तरीदेखील कोहली आज सामन्यापूर्वी आनंदात पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली.

या सामन्यात आरसीबीने संघात तीन बदल केले. सामन्यापूर्वी कोहली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन टॉससाठी एकत्र आले होते. टॉस झाल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित फुलल्याचे पाहायला मिळाले. कारण यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोहलीने नाणेफेक जिंकली होती.

हा पाहा व्हिडीओ



 

नाणेफेक जिंकल्यावर कोहली म्हणाला की, " यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मी टॉस जिंकलो, त्यामुळे मी आनंदित आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मला नाणेफेकीच्या कौलने हुलकावणी दिली होती. पण मोसमाच्या अखेरीस तरी मला टॉस जिंकता आला आहे."

Web Title: IPL 2019: For the first time in this year's IPL, Kohli was the first time Lucky, the 'thing' happened