आयपीएल २०१९ : यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सच्या हैदराबादने दिल्लीच्या संघाला 155 धावांवर रोखले. खलीलने या सामन्यात ३० धावांत ३ बळी मिळवले.
हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या संघात पुनरागमन करणाऱ्या खलील अहमदने सुरुवातीला भेदक मारा केला. खलीलने पृथ्वी शॉ आणि त्यानंतर शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले असले तरी या सामन्यात प्रथमच यंदाच्या हंगामात खेळणाऱ्या कॉलिन मुर्नोने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुर्नोने २४ चेंडूंत ४० धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या हैदराबादच्या अभिषेक शर्माने बाद केले.
मुर्नो बाद झाल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी संयतपणे फलंदाजी केली. पण भुवनेश्वर कुमारने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसला ४० चेंडूंत ४५ धावा करता आल्या. श्रेयस पाठोपाठ पंतही बाद झाला. खलीलने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. पंतने १९ चेंडूंत २३ धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ
आयपीएलच्या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता असते. आयपीएलचे चाहते सर्व वयोगटांमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भेटायला एक आज्जीबाई आल्या होत्या. आता तर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भेटायला एक नन्ही परी आल्याचे पाहायला मिळाले.
सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. वॉर्नरचे पायही तिच्याकडे वळले. ती नन्ही परी होती वॉर्नरची मुलगी. वॉर्नर तिच्याकडे वळल्यावर तिने आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
पाहा हा व्हिडीओ