Join us

IPL 2019 : चेन्नईचा भेदक मारा, दिल्लीच्या 147 धावा

ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 21:40 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या धावा आटल्या. ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केले आणि त्यांचे कंबरडे मोडले. चेन्नईच्या अचूक गोलंदाजीमुळे दिल्लीला 147 धावांवर समाधान मानावे लागले. शिखर धवनने अर्धशतक झळकावल्यामुळे दिल्लीला ही मजल मारता आली.

दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. पृथ्वी शॉ याने दमदार फटकेबाजी करत २४ धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यावर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. धवनने सात चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. 

 

 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019