Join us

IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय

दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 19:31 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : आरसीबीवर विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीने आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते, पण आरसीबीच्या संघाला हे आव्हान पेलवता आले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीने आरसीबीवर १६ धावांनी विजय मिळवला.

 

दमदार सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सची घसरगुंडी पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या मधल्याफळीला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. त्यामुळे दिल्लीला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण पृथ्वीला मोठी खेळी साकारता आली नाही. पृथ्वीला १८ धावांवर समाधान मानावे लागले.

पृथ्वी बाद झाल्यावर धवन आणि श्रेयस अय्यर यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनीही आपली अर्धशतके झळकावली. पण हे दोघेही अर्धशतक झळकावल्यावर लगेचच बाद झाले. धवनने ३७ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५० धावा केल्या. श्रेयसने ३७ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडला. रिषभ पंत, कॉलिन इनग्राम यांना जास्त धावा काढता आल्या नाहीत.

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सआयपीएल 2019शिखर धवन