Join us

IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान

अय्यरने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 21:38 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : सनरायझर्स हैदाराबादच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात भेदक मारा केला आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घातले. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. दिल्ली प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा करता आल्या.

हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले. पण दिल्लीचे सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर अय्यरला दुसऱ्या फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळेच दिल्लीला मोठी धावसंख्या रचता आली नाही. अय्यरने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स