जयपूर, आयपीएल २०१९ : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससमोर आज गुणतालिकेत अव्वलस्थावनी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात राजस्थानची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे आज बलाढ्य चेन्नईचे आव्हान परतवून लावण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. तर सहा सामन्यांमधून दहा गुणांची कमाई करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ अजून एका विजयासह प्लेऑफमध्येच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात असेल.
11:48 PM
शेवटच्या चेंडूवर षटकार; चेन्नईचा विजय
11:45 PM
शेवटच्या चेंडूमध्ये 3 रनची गरज
नो बॉलचा निर्णय मागे घेतल्यावरून वाद
11:40 PM
महेंद्रसिंह धोनी क्लीन बोल्ड
11:37 PM
रविंद्र जडेजाचा हेलिकॉप्टर शॉट; क्रिझवर पडत षटकार ठोकला
11:36 PM
चेन्नई सुपर किंग्जला 6 चेंडूत 18 धावांची गरज
11:33 PM
महेंद्र सिंह धोनीचे अर्धशतक
महेंद्र सिंह धोनीने 40 चेंडून 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले.
11:28 PM
चेन्नई सुपर किंग्जला 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज
चेन्नई सुपर किंग्जला 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असून कप्तान महेंद्र सिंग धोनी क्रिझवर आहे.
11:26 PM
अंबाती रायडू 57 धावांवार बाद
11:09 PM
अंबाती रायुडूचे अर्धशतक पूर्ण, चेन्नईचे शतक फलकावर
10:58 PM
धोनी आणि रायुडूने सावरला चेन्नईचा डाव, सामना रंगतदार अवस्थेत
10:25 PM
केदार जाधव माघारी, चेन्नईला चौथा धक्का
10:15 PM
फाफ डू प्लेसिस माघारी, चेन्नईला तिसरा धक्का
10:02 PM
सुरेश रैना 4 धावांवर धावबाद, चेन्नईला दुसरा धक्का
09:56 PM
चेन्नईला पहिला धक्का, धवल कुलकर्णीने शेन वॉटसन शुन्यावर बाद
09:36 PM
राजस्थानचे चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान
09:26 PM
बेन स्टोक्स 28 धावांवर बाद, राजस्थानला सातवा धक्का
09:08 PM
राजस्थानला सहावा धक्का, पराग 16 धावांवर बाद
08:52 PM
स्टीव्हन स्मिथ बाद, राजस्थानला पाचवा धक्का
08:45 PM
राहुल त्रिपाठी 10 धावांवर बाद, जडेजाने घेतली विकेट
08:34 PM
संजू सॅमसन बाद, राजस्थानला तिसरा धक्का
08:23 PM
रहाणेपाठोपाठ बटलरही बाद, शार्दुल ठाकूरने घेतली बटलरची विकेट
08:16 PM
अजिंक्य रहाणे 14 धावांवर बाद, राजस्थानला पहिला धक्का