Join us  

IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला...

IPL 2019 CSK vs MI: सामन्याच्या 7 व्या षटकात बाद असूनही इव्हान लुईस खेळपट्टीवर चिकटून राहिला..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 8:53 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : सामन्याच्या 7 व्या षटकात बाद असूनही इव्हान लुईस खेळपट्टीवर चिकटून राहिला... मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला असता, परंतु कोणीच अपील केले नाही. 

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत सुरैश रैनाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून रैनाने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. पण, दीपक चहरने तिसऱ्या षटकात मुंबईला पहिला धक्का दिला. चहरने मुंबईचा सलामीवीर डी कॉकला ( 15)  माघारी पाठवले. इव्हान लुईसने कॅप्टन रोहितसह मुंबईला पॉवर प्लेमध्ये 1 बाद 45 धावा उभारून दिल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लुईसने इम्रान ताहीरच्या एका षटकात 14 धावा चोपून काढल्या. डावाच्या 7 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लुईसच्या बॅटची कडा घेत चेंडू यष्टिरक्षक अंबाती रायुडूच्या हातात झेपावला. मात्र, कोणीही अपील केली नाही. अल्ट्रा एजमध्ये चेंडू लुईसच्या बॅटला लागल्याचे दिसताच भज्जीनं डोक्यावर हात मारला.पाहा व्डिडीओ...

https://www.iplt20.com/video/180218/the-edge-that-csk-missed

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सहरभजन सिंग