IPL 2019 CSK vs KXIP : पंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने खेचून आणला विजय

IPL 2019 CSK vs KXIP : 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:34 PM2019-04-06T19:34:02+5:302019-04-06T20:00:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs KXIP : Chennai Super Kings beat Kings XI Punjab by 22 runs | IPL 2019 CSK vs KXIP : पंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने खेचून आणला विजय

IPL 2019 CSK vs KXIP : पंजाबची टाय टाय फिश, चेन्नईने खेचून आणला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. पण, महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि राहुल-सर्फराजवर दडपण निर्माण केले. त्याच जोरावर चेन्नईने हा सामना 22 धावांनी जिंकला. 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले.



किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या. चेन्नईने 15 षटकांत 3 बाद 108 धावा केल्या. पंजाबच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करताना चेन्नईच्या धावांवर चाप बसवला. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांना मोठे फटके मारण्याची संधी त्यांनी दिली नाही. 14 चेंडूंनंतर धोनीला पहिला चौकार मारण्यात यश आले. त्यानंतर धोनीला सूर गवसला. त्याने फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या, तर रायुडूने 15 चेंडूंत 21 धावा केल्या. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली.


प्रत्युत्तरात, पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीनं दुसरे षटक हरभजन सिंगला टाकण्यासाठी बोलावले. भज्जीनं हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. भज्जीनं पहिल्याच षटकात एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या. त्यानंतर लोकेश राहुल व सर्फराज खान यांनी सावध खेळ केला. पंजाबने पाच षटकांत 2 बाद 35 धावा केल्या. पहिल्या पॉवर प्लेत पंजाबच्या 2 बाद 46 धावा झाल्या होत्या. राहुल व सर्फराज या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पंजाबला मजबूत स्थिती मिळवून दिली. 


सर्फराज आणि राहुल यांच्या संयमी खेळीने पंजाबने 10 षटकांत 2 बाद 71 धावा केल्या. त्यात राहुलच्या 36, तर सर्फराजच्या 29 धावा होत्या. 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते. 


सर्फराज आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सर्फराजने 43 चेंडूंत 51 धावा केल्या, तर राहुलने 42 चेंडूंत 51 धावा केल्या.




पण, या दोघांना चेन्नईच्या गोलंदाजांनी मोठे फटके मारण्यापासून रोखले. त्यामुळे चेंडू व धावांचे अतंर वाढले. त्याच दडपणात राहुल विकेट देऊन बसला. त्याने 47 चेंडूंत 55 धावा केल्या. त्यात 1 षटकार व तीन चौकार होते. राहुल बाद झाल्याने सर्फराजसह 110 धावांची भागीदारीही सपुष्टात आली. सर्फराजही 59 चेंडूंत 67 धावा करून माघारी परतला. 

Web Title: IPL 2019 CSK vs KXIP : Chennai Super Kings beat Kings XI Punjab by 22 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.