Join us

IPL 2019 CSK vs DC : ना इथे ना तिथे, दिल्लीच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण

दिल्लीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने संधी गमावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 21:44 IST

Open in App

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एकेक पत्ते बाहेर काढून दिल्लीच्या धावांवर अंकुश ठेवला. कॉलीन मुन्रो आणि रिषभ पंत वगळता दिल्लीच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला असता, परंतु दिल्लीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने संधी गमावली.

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फॅफ ड्यू प्लेसिसने चेंडू टोलावला. तो चेंडू दिल्लीच्या खेळाडूच्या हातात असतानाही नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शेन वॉटसनने धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. फॅफ आणि वॉटसन यांच्यातील समन्वयाच्या फायदा दिल्लीला सहज झाला असता. त्यांना दोघांनाही धावबाद करण्याची संधी होती, परंतु धावबाद सोडा दिल्लीच्या खेळाडूंनी चेन्नईला अतिरिक्त धावा दिल्या.

पाहा व्हिडीओ..

 

 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स