Join us  

IPL 2019 : अंतिम सामन्यासाठी चेन्नईचे नाव आघाडीवर, बीसीसीआयला विश्वास

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:47 PM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा दोन टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यात 17 सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयनं मंगळवारी साखळी गटातील सर्व सामन्यांचे स्थळ व वेळ जाहीर केली. पण, प्ले-ऑफ व अंतिम फेरीबाबत अजूनही गुढ कायम आहे.लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. त्यानुसार सुरक्षे यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल वेळापत्रक जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. आयपीएलमधील सर्व संघ मालक आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणेशी  चर्चा केल्यानंतर मंगळवारी अखेरीस त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील निवडणुकीपूर्वीच लीग सामने संपवण्यात येणार आहेत.  

''मतदानाच्या तारखांच्या नजीक आयपीएलचा सामना असणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यानुसारच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्यामुळे 6 एप्रिल ते 2 मे या कालावधीत तेथे सामना खेळवण्यात येणार नाही.  त्यानुसारच अंतिम सामन्याचे ठिकाण ठरवण्यात येणार आहे आणि त्यासाठी चेन्नईचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :आयपीएल 2019आयपीएलचेन्नई