Join us  

IPL 2019: वॉर्नर आणि बेअरस्टोव यांच्या शतकांचे सेलिब्रेशन, पाहा एकाच व्हीडीओमध्ये...

या खास व्हिडीओमध्ये दोन्ही फलंदाजांचे एकत्रित सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 6:46 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव या दोघांनीही रविवारच्या सामन्यात शतके झळकावली. या सामन्यात बेअरस्टोवने पहिले शतक झळकावले आणि त्यानंतर वॉर्नरने शतक पूर्ण केले. पण या दोघांच्या शतकांचे एकाचवेळी सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. या खास व्हिडीओमध्ये दोन्ही फलंदाजांचे एकत्रित सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल.

हा पाहा खास व्हीडीओ

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 231 धावा चोपल्या. बेअरस्टोनं 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या, तर वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या.

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली. मोईन अलीच्या पहिल्याच षटकात या जोडीनं 14 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. हैदराबादच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना 6 षटकांत 59 धावा चोपल्या. या दोघांची ही आयपीएलमधील तिसरी अर्धशतकी भागीदारी ठरली. वॉर्नर - बेअरस्टो ही आंतरराष्ट्रीय अनुभव असलेली जोडी समोर असूनही 16 वर्षीय प्रयास रे बर्मनने चोख गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच षटकात केवळ 6 धावा दिल्या. बेअरस्टोनं अर्धशतक पूर्ण करताना संघालाही शतकी पल्ला पार करून दिला. हैदराबादने 10 षटकांत बिनबाद 105 धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नरनेही 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत दोन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. अर्धशतकानंतर वॉर्नरने अधिक आक्रमक खेळ केला. त्यामुळे हैदराबादने 15 षटकांत बिनबाद 164 धावा केल्या. 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा चोपल्या. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादकडून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम नावावर केला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावा केल्या आणि शिखर धवन व केन विलियम्सन यांनी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केलेल्या दुसऱ्या विकेटसाठीचा 176 धावांचा विक्रम मोडला. युजवेंद्र चहलने ही जोडी फोडली. 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा करणाऱ्या बेअरस्टोला त्याने बाद केले. 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर