Join us  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीसाठी बस सज्ज

सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:57 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. मुंबईने हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सवर अखेरच्या चेंडूवर मात केली आणि जेतेपद पटकावले. विजयानंतर संघाने मैदानात सेलिब्रेशन केले. पण आता त्यांची जंगी मिरवणूकही काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीसाठी खास बस बनवण्यात आली आहे. ही विजयी मिरवणूक साडे सहा वाजता सुरु होणार आहे.

 मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल जेतेपदाचा चौकार खेचला आणि सर्वाधिक जेतेपद जिंकण्याचा मान पटकावला. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 साली आयपीएलचा विजयी चषक उंचावला आहे. त्यामुळे त्यांचे मुंबईत स्वागतही तितक्याच थाटामाटात होणे अपेक्षित आहे. मुंबईकर आपल्या लाडक्या संघाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला असून आजच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. मुंबई इंडियन्सच्या विजयी शिलेदारांनी खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता या मिरवणूकीला पेडर रोडपासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ट्रायडंट हॉटेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येतील. 

अशी असेल मिरवणूक....

सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईलमिरवणूकीतील सुरुवातीचा 400 मीटरचा प्रवास हा पुणेरी ढोलच्या गजरात काढण्यात येणार आहेजस्लोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून बस ट्रायडंटच्या दिशेने नेण्यात येईल त्यानंतर रात्री 9 वाजता अँटिलिया येथे खेळाडू, संघ मालक, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितील पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे .

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स