Join us  

IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल

अश्विन पुन्हा एकदा धवनला  'मंकड रनआऊट' करायला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:31 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : या आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विन हा  'मंकड रनआऊट' मुळे प्रकाशझोतात आला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन पुन्हा एकदा धवनला  'मंकड रनआऊट' करायला गेला. त्यावेळी धवनने अश्विनला क्रीझमध्ये नाचत उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा व्हिडीओ

. असा नो-बॉल तुम्हा पाहिलात का?गोलंदाजी करताना क्रीझच्या पुढे पाय पढला तर नो-बॉल दिला जातो. फलंदजाच्या डोक्यावरून बॉल गेला किंवा फलंदाजाच्या थेट कंबरेच्यावर चेंडू गेला तर नो-बॉल दिला जातो. एका षटकामध्ये दोन बाऊन्सर टाकले की नो-बॉल दिला जातो. पण किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक अनोखा नो-बॉल पाहायला मिळाला, पण असा नो-बॉल यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल.

... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेलच, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाहीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली. पण ख्रिस गेलचा झेल जो यावेळी पकडला तो तुम्ही कधीही पाहिला नसेल. गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.

बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही गेलने मोठा फटका मारला. पण हा चेंडू सीमारेषेजवळ असलेल्या कॉलिन इन्ग्रामने पकडला. पण चेंडू पकडल्यावर त्याला तोल जात होता. आपला तोल जातोय हे कॉलिनला समजले. त्यावेळी त्याने आपल्या जवळ कोणी क्षेत्ररक्षण आहे का, हे पाहिले. त्यावेळी अक्षर पटेल कॉलिनच्या जवळ होता. त्यावेळी कॉलिनने हा चेंडूं थेट अक्षरच्या हातामध्ये फेकला आणि गेल बाद झाला.

गेल आऊट आहे कि नाही, हे मैदानावरील पंचांनाही ठरवता येत नव्हते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहिली आणि अखेर गेल बाद असल्याचा निर्णय दिला.

टॅग्स :शिखर धवनआर अश्विनकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019