- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
टी-२० मधील कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू कसा सिद्ध करतो, हे महत्त्वाचे असते. कारण खेळाचे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. खेळाडूंच्या फॉर्मचे या दोन्ही प्रकारांत मूल्यांकन करणे जरा कठीण असते. तरीही विश्वचषकापूर्वी आयपीएल स्पर्धेचे महत्त्व असते. टी-२० क्रिकेटच्या काही मर्यादा आहेत. तरीही काही वेगवान गोलंदाजांनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना त्यावर मात केली आहे. आयपीएलने त्यात मोलाची भूमिका बजावली.
आॅस्ट्रेलियासाठी शेन वॉटसनचा विचार करा, किंवा भारतीय खेळाडूंनी (आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह) किंवा आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये केलेल्या दमदार फलंदाजीमुळे त्याचा विचार वेस्ट इंडिजच्या संघात झाला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये महेंद्र सिंग धोनी याला आयपीएलने चांगली मदत केली आहे. या स्पर्धेपूर्वी त्याच्या फॉर्मवर शंका घेतली जात होती. मात्र, शंका घेणाऱ्यांची तोंडे धोनीने बंद केली आहेत. त्याने संघाची आणि डावाची गरज ओळखली. त्याने सावधगिरी आणि आक्रमण ज्या पद्धतीने केले ती पद्धत खरोखरीच इतरांसाठी अनुकरणीय अशी होती. त्याने स्पर्धेत उत्कृष्ट यष्टीरक्षण केले.
असाधारण कौशल्याच्या जोरावर तो आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू आहे, असे माझे मत आहे. हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांचा फॉर्मदेखील काही कमी नव्हता. या दोघांनी एका टीव्ही शोमध्ये केलेल्या चुकीमुळे ते अडकले. मात्र, त्यातून बाहेर कसे पडावे, हे त्यांनी दाखवून दिले.
कुलदीपलाही आयपीएलमध्ये चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याला सराव सामन्यात चांगला खेळ करावा लागेल. इतर खेळाडूंच्या बाबतीत सांगायचे झाले तर कोहली, धवन, रोहित यांनी आपापल्या संघांसाठी चांगली खेळी केली आहे. त्यांनी आपल्या खेळातून आत्मविश्वास दाखविला.
गोलंदाजांमध्ये शमी, बुमरा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर आणि जडेजा यांनी आपली टीम इंडियातील निवड योग्य ठरविली आहे. त्यांनी सातत्याने बळी मिळवले आहेत. खेळाडूंना विश्वचषकासाठी शंभर टक्के योगदान द्यावे लागेल. सुदैवाने केदार जाधवला फ्रॅक्चर नाही. त्यामुळे त्याला पुन्हा आपला फिटनेस मिळविण्यासाठी वेळ आहे.
राहुल याला विश्वचषकात पहिल्या सामन्यापासूनच अंतिम
११ मध्ये सहभागी करून घ्यावे, निवडकर्त्यांनी विजय शंकरला ज्या थ्री डायमेंशनसाठी निवडले त्याला ते या स्पर्धेत दाखविता आले नाही. तो कामगिरीत मागे राहिला आहे. या बाबतीत विश्वचषकासाठी संघात निवड झाल्याने त्याने सर्वांना धक्का दिला आहे.
अष्टपैलूंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास विजय शंकर याने या स्पर्धेत फारसी गोलंदाजी केली नाही. तसेच धावादेखील फारशा केल्या नाहीत. त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे विश्वचषकातील सराव सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकासाठी चांगली खेळी करणे गरजेचे आहे.