Join us

Video : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स 

गेलच्या या तुफानी शतकी खेळीमुळे पंजाबला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 12:33 IST

Open in App

मुंबई : आपीएलच्या 11व्या सीझनमधील पहिलं शतक झळकावून ख्रिस गेल चर्चेत आला. गेलच्या या तुफानी शतकी खेळीमुळे पंजाबला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला. 

ख्रिस गेलने राशिदच्या चार बॉलवर लागोपाठ चार सिक्सर लगावले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इतकेच काय तर त्याचं शतक होताच युवराज सिंहने गंगनम स्टाईल डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हंगामातील पहिले शतक

गेलने हैदराबाद विरुद्ध 11 व्या हंगामातील पहिलं शतक ठोकलं. गेलने लीगमधलं सहावं तर टी20 क्रिकेटमधलं 21 वं शतक पूर्ण केलं आहे. लीगमधील अनेक रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे. गेलला सुरुवातीला कोणीच खरेदी केलं नव्हतं. पण शेवटी पंजाबने बेस प्राईस 2 कोटींना गेलला खरेदी केलं. याची खंत देखील गेलने शेवटी बोलून दाखवली. 

टॅग्स :आयपीएल 2018युवराज सिंग