Join us

IPL 2018: जेव्हा विराट कोहलीला मिळालं फॅनचं रक्ताने लिहिलेलं लव्ह लेटर

फॅन्स आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या रॉयल चॅलेंजर्सचं नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने सांगितलाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:43 IST

Open in App

मुंबई : स्टार क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या फॅन्सचे अनेक विचित्र अनुभवावे लागतात. हे फॅन्स आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या रॉयल चॅलेंजर्सचं नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने सांगितलाय. 

एका फॅनने रक्ताने लिहिलेलं लेटर पाहून तो कसा आश्चर्यचकीत झाला होता, याचा त्याने पहिल्यांदाच खुलासा केलाय. जगभरात कोहलीचे फॅन्स आहेत. खासकरुन महिला त्याच्या खेळाच्या आणि त्याच्या लूक्सवर जीव ओवाळतात. पण कोहलीसोबत रक्ताने लिहिलेल्या लेटरची घटना दिल्लीत घडली होती.फॅनचं रक्ताने लिहिलेलं लव्ह लेटर

विराट कोहलीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला एक रक्तीने लिहिलेलं पत्र मिळालं होतं. ही गोष्ट फार विचित्र होती. ही घटना दिल्लीत घडली होती. मी माझ्या कारने जात होतो. दरम्यान काही फॅन्सना ऑटोग्राफ देण्यासाठी मी कारच्या खिडकीची काच खाली केली. अशातच माझ्यासमोर हे पत्र आलं. मी हे बघू शकलो नाही की, ते कुणी दिलं. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. ते मी माझ्या सुरक्षा रक्षकांकडे दिलं. मी ते घेऊच शकत नव्हतो. ते खूप घाबरवणारं होतं'. 

आयपीएलसाठी खेळाडूंना वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं. अशात अनेकदा फॅन्सना खेळाडूंसोबत फोटो काढण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळते. असाच आणखी एक मजेदार किस्सा विराटने शेअर केला. 

कोहलीने सांगितले की, 'मी एकदा फ्लाईटमध्ये होतो. मी हेडफोन लावून सीटवर झोपलो होतो. अचानक मला जाग आली आणि मी पाहिले तर माझ्या मांडीवर एक लहान मुल होतं. कुणी माझ्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेत होते. मी चष्मा घातला होता. त्यामुळे त्यांना वाटले असेल की, मी त्यांना बघतोय. पण मी झोपेत होतो'. 

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहली