Join us

IPL 2018 : रशिद खानच्या गुगलीवर विराट कोहली फेल ठरतो तेव्हा... 

गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली रशिद खानच्या गुगलीवर ज्यापद्धतीने ' क्लीन बोल्ड ' झाला ते त्याच्या लौकिकाला साजेसं नक्कीच नव्हतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 18:29 IST

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडू रशिदने गुगली टाकली होती. या चेंडूचा अंदाज कोहलीला घेताच आला नाही. आडव्या बॅटने तो मोठा फटका मारायला गेला आणि त्याच्या मधल्या यष्टीचा वेध रशिदच्या गुगलीने घेतला.

बंगळुरु : विराट कोहली म्हणजे ' रन मशिन '... असं बरीच जण म्हणत असतात. पण सध्याच्या आयपीएलमध्ये तरी या  ' रन मशिन 'ला गंज लागलाय की काय, असं म्हणण्याची वेळ आली आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली रशिद खानच्या गुगलीवर ज्यापद्धतीने ' क्लीन बोल्ड ' झाला ते त्याच्या लौकिकाला साजेसं नक्कीच नव्हतं.

गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. एबी डी'व्हिलियर्स आणि मोईन खान यांनी धमाकेदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली आणि त्यामुळेच बँगलोरला धावांचा डोंगर उभारता आला. पण कोहली मात्र या सामन्यात पुरता नापास ठरला. कोहलीला या सामन्यात 11 चेंडूंत फक्त 12 धावाच करता आल्या. यावेळी कोहली ज्यापद्धतीने बाद झाला ते त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडलेलं नसेल.

या सामन्यात पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडू रशिदने गुगली टाकली होती. या चेंडूचा अंदाज कोहलीला घेताच आला नाही. आडव्या बॅटने तो मोठा फटका मारायला गेला आणि त्याच्या मधल्या यष्टीचा वेध रशिदच्या गुगलीने घेतला. या गोष्टीचा परीणाम कोहलीच्या नेतृत्वावरही झाला. त्याने मैदानात पंचांशी हुज्जत घातली. त्याचबरोबर एक झेल आणि चौकारही सोडला. ही चूक सुधारून कोहली पुढच्या सामन्यात तरी चांगली फलंदाजी करणार का, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेल.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसनरायझर्स हैदराबाद