Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : जेव्हा ब्राव्होच्या गाण्यावर कोहली ठेका धरतो तेव्हा...

कोहली हा मैदानात एवढा आक्रमक असतो की, तो नृत्यही करू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण नृत्य करत असल्याचा एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 17:32 IST

Open in App
ठळक मुद्देवेस्ट इंडिजच्या संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यावर ' चॅम्पियन्स ' हे गाणे गायले होते. ब्राव्होने यावेळीही तेच गाणे गायले आणि त्यावर भारताच्या खेळाडूंनी नृत्य केले. 

मुंबई : आयपीएल म्हणजे क्रिकेटपटूंसाठी एक कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्यात मनात कोणताही द्वेष न ठेवता सर्व खेळाडू एकत्र येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे काही तासांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली, चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन ब्राव्हो आणि हरभजन सिंग आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमात ब्राव्होने एक गाणे गायले आणि त्यावर चक्क ठेका धरला तो कोहलीने.

 

 

कोहली हा मैदानात एवढा आक्रमक असतो की, तो नृत्यही करू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण नृत्य करत असल्याचा एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कोहलीबरोबर हरभजन आणि राहुलही एकत्र नाचताना दिसत आहेत.

ब्राव्हो हा एक गुणी अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याची नेत्रदीपक कामगिरी आपण सर्वांनीच या मोसमातही पाहिली आहे. पण ब्राव्हो हा एक चांगला गायकही आहे. त्याच्या गाण्याने कोहलीला एवढी भुरळ पाडली की त्याने त्यावर थेट ठेकाच धरला.

भारतामध्ये झालेला ट्वेन्टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघाने जेतेपद पटकावल्यावर ' चॅम्पियन्स ' हे गाणे गायले होते. ब्राव्होने यावेळीही तेच गाणे गायले आणि त्यावर भारताच्या खेळाडूंनी नृत्य केले. 

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहलीहरभजन सिंग