ठळक मुद्देधोनी झिवाला घेऊन संघाबरोबर फोटो काढण्यासाठी उभा राहीला. मात्र झिवा तिथे का रमली नाही, ते दस्तुरखुद्द धोनीने सांगितले आहे.
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे आपली लेक झिवावर किती प्रेम आहे, हे जगजाहीर आहे. आतापर्यंत धोनीने झिवाबरोबरचे आपले फोटो आणि व्हीडीओ बऱ्याचदा शेअर केले आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. तेव्हा सामना संपल्यावर झिवा धोनीला येऊ बिलगली. त्यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया...
शेन वॉटसनने तुफानी फलंदाजी करत आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं, नाबाद 117 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. विजयी फटका लगावल्यावर सर्व संघ वॉटसनला भेटण्यासाठी धाव घेत मैदानात शिरला. त्यानंतर चेन्नईच्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी सर्व संघ चषकासह फोटो काढण्यासाठी आतूर होता. फोटो काढले जात होते. तेव्हा धोनीला कळलं की आपली लेक झिवा, आपल्या मागच्या बाजूला आहे. त्यावेळी धोनीने झिवाला हाक मारली आणि ती धोनीला येऊन बिलगली. धोनी झिवाला घेऊन संघाबरोबर फोटो काढण्यासाठी उभा राहीला. मात्र झिवा तिथे का रमली नाही, ते दस्तुरखुद्द धोनीने सांगितले आहे.
याबाबत धोनी म्हणाला की, " धोनी मला येऊन बिलगली तेव्हा मला वाटलं की तिला चषकाबरोबर फोटो काढायचा असेल. पण तिच्या मनात तसं काहीच नव्हंत. कारण तिला चषकाबरोबर फोटो काढण्यात काहीच रस नव्हता. तिला विजयानंतर फक्त मैदानात रपेल मारायची होती. "