Join us

IPL 2018 : आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत; सामन्यानंतर भडकला कोहली

पराभवानंतर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली संघावर चांगलाच भडकला होता. त्यामुळे सामन्यानंतर आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत, असे कोहली म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 18:52 IST

Open in App
ठळक मुद्दे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ सध्या पराभवाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही सोमवारी त्यांना पराभव पत्करावा लागला.

हैदराबाद : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ सध्या पराभवाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही सोमवारी त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली संघावर चांगलाच भडकला होता. रागाच्या भरात सामन्यानंतर 'आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत,' असे कोहली म्हणाला.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केन विल्यम्सनच्या अर्धशतकामुळे बँगलोरपुढे 147 धावांचे आव्हान ठेवले होते. आयपीएलमध्ये हे माफक आव्हान समजले जाते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. जर हे आव्हान बँगलोरचा संघ पूर्ण करू शकत नाही, तर ते बाद फेरीत पोहोचू शकतील का, असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे.

या पराभवानंतर कोहली म्हणाला की, " आम्ही विजयाचे हकदार नक्कीच नाही. कारण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आम्हाला चांगला खेळ करता आला नाही. आमच्या फलंदाजांनी बरेच चुकीचे फटके मारले आणि त्यामुळेच आम्हाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. "

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद