Join us

सेहवागने फॅन्सना असे बनवले एप्रिल फूल, फॅन्सही झाले होते अवाक्

किंग्स इलेव्हन पंजाबने ट्विट करुन माहिती दिली की, सेहवाग पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 10:50 IST

Open in App

नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने एप्रिल फूलच्या निमित्ताने आपल्या फॅन्सची अशी काही फिरकी घेतली की, सर्वचजण काही वेळासाठी हैराण झाले. झालं असं की, किंग्स इलेव्हन पंजाबने ट्विट करुन माहिती दिली की, सेहवाग पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणार आहे. सेहवाग 8 एप्रिलला दिल्ली डेअरडेनिल्स विरुध्द ओपनिंग करताना दिसणार आहे. खरंतर सेहवाग आयपीएलमध्ये खेळणार नाहीये. हा चाहत्यांना मुर्ख बनवण्याचा एक फंडा होता. 

वीरेंद्र सेहवागने स्वत: एक व्हिडीओ शेअर करुन फॅंन्सना ही माहिती दिली. किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन सेहवागचा व्हिडीओ शेअर केला. सेहवागच्या प्रॅंकने लोकांना चांगलेच मुर्ख बनवले.

टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने 1 एप्रिलच्या दिवशी लोकांना चांगलेच एप्रिल फूल केले. महत्वाची बाब म्हणजे लोकांनी यावर विश्वासही ठेवला. 

वीरेंद्र सेहवाग किंग्स इलेव्हन पंजाबचा मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे. तर दुसरीकडे एरॉन फिंच लग्न करणार असल्याने यावेळी न खेळण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पंजाब टीम ओपनिंगसाठी खेळाडूची पर्याय शोधत आहेत.

टॅग्स :क्रिकेट