आयपीएल 2018: विराट कोहली दाढी कधी करणार?... हे बघा त्यानंच दिलं उत्तर

विराट कोहलीचा सध्याचा लूक पाहता त्याच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 17:54 IST2018-05-17T18:26:38+5:302018-05-18T17:54:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Virat Kohli Says His Beard is Here to Stay | आयपीएल 2018: विराट कोहली दाढी कधी करणार?... हे बघा त्यानंच दिलं उत्तर

आयपीएल 2018: विराट कोहली दाढी कधी करणार?... हे बघा त्यानंच दिलं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - विराट कोहलीचा सध्याचा लूक पाहता त्याच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत. विराटचा हा दाढीतील लूक अनेकांचं लक्ष वेधतोय. विराट कोहलीने आज एका मुलाखतीत आपण आयुष्यात दाढी कधीच काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्यंतरी भारतीय संघातील खेळाडूंनी दाढी वाढवून क्रीडा विश्वात नवा ट्रेंड सुरु केला होता. पण कालातरांनी काही खेळाडूंनी दाढी काढल्यानंतर विराट कोहली दाढी काडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्याला पडला होता. पण खुद्द विराट कोहीलने आपण कधीच दाढी काढणार नसल्याचे सांगितले आहे. 

मला दाढी आवडते अन् ती माझ्यावर सुटही होते. त्यामुळे मी कधीच ती काढणार नाही. असे कोहलीने आज गुरुवार बंगळुरुतील एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. पुढे तो म्हणाला की, ज्यावेळी माझी दाढी वाढते त्याचे केस टोचायला लागतात त्यावेळी मी ट्रीम करत असतो. पण क्लीन शेव्ह करण्याचा मी कधीच विचार करु शकत नाही. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी दाढी वाढवायचा क्रिकेटपटूंमध्ये एक ट्रेंड सुरू होता. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू स्टायलिश आणि आकर्षक दाढी ठेवत होते. पण  रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांनी दाढी काढली होती.  दाढी काढण्याचा नवाच ट्रेंड सुरू झाला होता. त्यावेळी विराट कोहलीनंही त्यांनाही दाढी काढणार नसल्याचं सांगितलं होते. विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर रवींद्र जाडेजा, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना टॅग करत कमेंट लिहिली की, सॉरी बॉस सध्या मी दाढी काढण्यासाठी उत्सुक नाही, पण तुमचा मेकओव्हर चांगला आहे. विराटचही ही इन्स्टाग्राम पोस्ट वाचताच अनुष्का शर्माने विराट कोहलीला विराट तू दाढी अजिबात काढू शकत नाहीस असा सल्लावजा आदेश दिला होता. 

Web Title: IPL 2018: Virat Kohli Says His Beard is Here to Stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.