IPL 2018: VIDEO- प्लेऑफमध्ये पोहचल्यावर कॅप्टन कूल धोनीला मिळाली स्पेशल सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:08 IST2018-05-14T13:08:53+5:302018-05-14T13:08:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
 IPL 2018: VIDEO- ms dhoni salute from a dog after reaching in playoff | IPL 2018: VIDEO- प्लेऑफमध्ये पोहचल्यावर कॅप्टन कूल धोनीला मिळाली स्पेशल सलामी

IPL 2018: VIDEO- प्लेऑफमध्ये पोहचल्यावर कॅप्टन कूल धोनीला मिळाली स्पेशल सलामी

मुंबई- आयपीएल 2018चं यंदाचा पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आयपीएलमधील संघ प्लेऑफमध्ये जागा मिळविण्यासाठी मेहनत घेत आहेत. हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही संघांनी मात्र प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अंबाती रायडूच्या शतकी खेळीमुळे चेन्नईला विजय आपल्या नावे करता आला. मॅच संपल्यानंतरचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची एक असा फोटो व्हायरल झाला आहे ज्या फोटोचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे. 

कॅप्टन कूल धोनीला कुत्र्यांची अतिशय आवड आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. रविवारी सामना संपल्यानंतर धोनी मैदानात सुरक्षेसाठी असलेल्या कुत्र्यांना भेटायला पोहचला. धोनीने त्या कुत्र्याबरोबर खूप धमाल केली. पण त्यानंतर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय आहे. धोनी ज्या कुत्र्याशी खेळत होता त्या कुत्र्याने धोनीला रॉयल सेल्यूट केला. त्यावेळी कुत्र्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकानेही धोनीला सेल्यूट केलं. चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

दरम्यान, रविवारी आयपीएलच्या 11 व्या पर्वातील 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. त्यानंतर चेन्नई सुपर किग्जने प्लेऑफमध्ये जागा बनविली आहे. 



 

Web Title:  IPL 2018: VIDEO- ms dhoni salute from a dog after reaching in playoff