Join us

IPL 2018 : सामन्यात गोंधळ, जडेजा आणि डू प्लेसीवर प्रेक्षकांनी फेकला बुट

चेन्नई आणि कोलकात्यामध्ये काल झालेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी बुटं फेकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 11:22 IST

Open in App

चेन्नई : चेन्नई आणि कोलकात्यामध्ये काल झालेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी बुट फेकला. कोलकाता संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांमध्ये हा प्रकार घडला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रेक्षकांनी बुटं रवींद्र जाडेजाला लक्ष्य करुन फेकली गेली. यानंतर आणखी दोन बुटं फेकण्यात आली जी फाफ डु प्लेसीला जाऊन लागली. डु प्लेसी या सामन्यात खेळला नाही. पण या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत प्रेक्षकांमधून दोन जणांना अटक केली. यानंतर चेन्नई टीमचे अधिकारी स्टेडियमजवळ पोहोचले आणि त्यांनी सीमारेषेवर उपस्थित लोकांना हटवलं. सामन्या आधी विविध पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कावेरी प्रबंधन बोर्ड (सीएमबी) आणि कावेरी जल नियामक समितीचं (सीडब्ल्यूआरसी) गठन न करण्याची मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. 

चेन्नईचा विजय - 

सॅम बिलिंग्ज आणि शेन वॉटसन यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा ५ गडी आणि एक चेंडू राखून पराभव करीत सलग दुसरा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेले २०३ धावांचे दिलेले कठीण लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जने १९.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सॅम बिलिंग्जने सर्वाधिक २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. 

आयपीएलवर बहिष्काराची मागणी

कावेरी नदीच्या पाणी वादावरून आयपीएलवर बहिष्कार टाकण्याची मागणी शशिकला यांचा भाचा टीवी दिनकरन यांनी केली होती. कावेरी वाद सुरु असताना चेन्नईमध्ये आयपीएल खेळवलं नाही पाहिजे, पण जर खेळाडूंना खेळायचंच असेल तर त्यांनी काळ्या पट्ट्या बांधाव्यात, असं रजनीकांत म्हणाले आहेत. कावेरी प्रबंधन बोर्ड आणि सीडब्ल्यूआरसीची स्थापना झाली तरच कावेरीचा मुद्दा सुटेल आणि न्यायाचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली.

आयपीएलपासून लांब राहा

एएमएमकेचे नेते दिनकरन यांनी आयपीएलपासून क्रिकेट रसिकांनी लांब राहावं, असं आवाहन केलं आहे. कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी नागरिकांनी आयपीएलपासून लांब राहावं, असं दिनकरन म्हणालेत.

टॅग्स :आयपीएल 2018रवींद्र जडेजा