Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : शाहरुख खानने मागितली चाहत्यांची माफी

बऱ्याच कार्यक्रमांना उशिरा आल्यावरही शाहरुखने कधी कुणाची माफी मागितल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे तो कुणाची माफी मागेल, हे तुम्हाला खरे वाटणार नाही. पण असे घडलेय आणि तेदेखील इडन गार्डन्समध्ये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 17:31 IST

Open in App
ठळक मुद्देकोलकात्याची लोक क्रिकेटवेडी आहेत. त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या पराभवामुळे धक्का बसला. त्यामुळेच शाहरुखने त्यांची माफी मागितली आहे.

कोलकाता : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा अहंकारी असल्याचं साऱ्यांनाच माहिती आहे. बऱ्याच कार्यक्रमांना उशिरा आल्यावरही त्याने कधी कुणाची माफी मागितल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे तो कुणाची माफी मागेल, हे तुम्हाला खरे वाटणार नाही. पण असे घडलेय आणि तेदेखील इडन गार्डन्समध्ये.

बुधवारी इडन गार्डन्समध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात कोलकात्याला मुंबईकडून 102 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या मोसमातील दुसऱ्या सामन्यातही कोलकाताचा संघ मुंबईला पराभूत करू शकला नाही.

कोलकात्याची लोक क्रिकेटवेडी आहेत. त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या पराभवामुळे धक्का बसला. त्यामुळेच शाहरुखने त्यांची माफी मागितली आहे. शाहरुख म्हणाला की, " विजय आणि पराभव या खेळाच्या दोन बाजू आहेत. कधी विजय मिळतो तर कधी पराभवही पदरी पडतो. पण तरीदेखील कोलकाता संघाचा मालक या नात्याने मी सर्व चाहत्यांची माफी मागू इच्छितो. "