Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : पृथ्वीचा 'शॉ'नदार 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?... लय भारी हाणलाय!

पृथ्वीची ४४ चेंडूतील ६२ धावांची खेळी लक्षवेधी होतीच, पण त्यातला हेलिकॉप्टर शॉट भन्नाटच होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 15:33 IST

Open in App

नवी दिल्लीः भारताला 'अंडर-19'चा चौथा विश्वचषक जिंकवून देणारा तरुण-तडफदार वीर पृथ्वी शॉ याने आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी आपला धडाकेबाज 'शो' दाखवला. ४४ चेंडूत ६२ धावांची त्याची खेळी लक्षवेधी होतीच, पण त्यातला हेलिकॉप्टर शॉट भन्नाटच होता. तो षटकार पाहून सगळ्यांनाच 'पृथ्वी पॉवर'ची प्रचिती आली. 

महेंद्रसिंह धोनीनं जेव्हा पहिल्यांदा हेलिकॉप्टर शॉट मारला होता, यॉर्कर चेंडू हवेतून सीमेपार धाडला होता, तेव्हा सगळेच अवाक झाले होते. आजही धोनीचा हा फटका पाहून अख्खं स्टेडियम उसळतं. त्यातली नजाकत काही औरच आहे. धोनीच्या या हॅलिकॉप्टर शॉटशी खूपसं साधर्म्य असलेला एक जबरदस्त फटका दिल्ली डेअरडेविल्सचा शिलेदार पृथ्वी शॉनं लगावला आणि सगळे बघतच राहिले. विशेष म्हणजे, जगातील दर्जेदार गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मिचेल जॉन्सनचा चेंडूवर पृथ्वीनं हा षटकार ठोकला. 

आयपीएल-११च्या पर्वात पार ढेपाळलेल्या दिल्लीनं काल सगळ्यांनाच चकित केलं. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी २१९ धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉने कॉलिन मुनरोसोबत तडाखेबंद सलामी दिली. त्याच्या ६२ धावांच्या पायावर कर्णधार श्रेयस अय्यरच्या ९३ धावांनी कळस चढवला आणि दिल्लीनं मोठा विजय साकारला. 

टॅग्स :आयपीएल 2018पृथ्वी शॉदिल्ली डेअरडेव्हिल्सकोलकाता नाईट रायडर्स