Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018: या मुलीचं पहिलं प्रेम होतं एम.एस.धोनी, फोटो व्हायरल

पुण्यात झालेल्या सामन्यात याचा नजारा बघायला मिळाला. इथेही चेन्नई टीमला चेन्नईमध्ये मिळतो तेवढा प्रतिसाद मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 14:09 IST

Open in App

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्स भलेही दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असले तरी या टीमच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता झाली नाहीये. पुण्यात झालेल्या सामन्यात याचा नजारा बघायला मिळाला. इथेही चेन्नई टीमला चेन्नईमध्ये मिळतो तेवढा प्रतिसाद मिळाला.

आधी हा सामना चेन्नईमध्ये होणार होता आणि कावेरी वादामुळे हा सामना पुणे येथे खेळवण्यात आला. पण मैदान बदलले असले तरी चेन्नईच्या लोकप्रियतेत कमी झाली नाहीये. इतकेच काय तर कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या लोकप्रियतेत कमतरता आली नाही. शुक्रवारी झालेल्या सामन्यासाठी चेन्नईचे फॅन्स स्पेशल ट्रेनने पुण्याला आले होते. 

 

या सामन्यावेळी धोनीच्या एका चाहतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. धोनीच्या या चाहतीचा फोटोही व्हायरल झाला आहे. इतकेच नाहीतर आसीसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिचा फोटोही शेअर केला आहे. धोनीच्या या चाहतीने एक बोर्ड हातात घेतले होते. त्यावर लिहिलेला संदेश सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरत आहे. 

 

टॅग्स :क्रिकेटआयपीएल 2018