Join us  

IPL 2018 : या गोलंदाजामुळं आमचा पराभव झाला - धोनीचे विश्लेषण

धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 11:58 AM

Open in App

मोहाली - अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जवर चार धावांनी विजय मिळवला. गेलच्या या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजबाने 20 षटकांत  197 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, धोनीच्या चेन्नईला 5 बाद 193 धावाच करता आल्या. धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.  या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. 

सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, पंजाबने चांगली गोलंदाजी आणि सांघिक खेळ केला म्हणून आमचा पराभव झाला. अटीतटीचा सामना झाला ज्यामध्ये पंजाबच्या संघाने आमच्यापेक्षा उत्कृष्ट खेळ केला. आम्हाला  आमच्या गोलंदाजी आणि फंलदाजी या दोन्ही क्षेत्रात कामगिरी उंचावावी लागेल. ज्यावेळी मी मैदानात फंलदाजी करत होतो त्यावेळी माझ्या डोक्यात हाच विचार घोळत होता. असे मत धोनीनं यावेळी व्यक्त केलं. यावेळी बोलताना धोनीनं पंजाबचा गोलंदाज मुजीबच उल्लेख केला. दोन्ही संघातील हा मोठा फरक आहे असे मत धोनीनं व्यक्त केले. 

गेलने स्फोटक फंलदाजी केली, त्यानंतर मुजीबनं योग्य टप्यावर गोलंदाजी करत दोन्ही संघातील अंतर दाखवून दिले. 20 षटाकांच्या सामन्यामध्ये 190 पेक्षा जास्त धावा आम्ही केल्या. पण आम्हाला मुजीबच्या गोलंदाजीवर धावा करता आल्या नाहीत. मुजीबने तीन षटकांत फक्त 18 धावा खर्च केल्या आणि चेन्नईच्या फंलदाजावर अंकुश ठेवला. चेन्नईच्या संघाला चार धावांनी पराभवला सामोर जाव लागलं. 

सामना सुरु असताना धोनीची पाठ दुखत होती. त्यामुळे फलंदाजी करण्यास त्रास होत होता. मात्र हा त्रास होत असतानाही त्याने टिच्चून फलंदाजी केली. पाठदुखीबाबत बोलताना धोनी म्हणाला, सामन्यात खेळाताना माझी पाठ प्रचंड दुखत होती. मात्र, देवाने मला ताकद दिली आहे. त्यामुळे पाठीच्या सहाय्याने मोठे शॉट लगावण्याची गरज पडत नाही. मला माझ्या खांद्यावर विश्वास आहे.  

टॅग्स :आयपीएल 2018एम. एस. धोनीचेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब