Join us

IPL 2018 : मोहम्मद शामीने केली आयपीएलच्या सरावाला सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून शामी हा आपली पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमुळे व्यथित होता. या आरोपांमुळे त्याची कारकिर्द संपणार, असे काही जणांना वाटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 20:33 IST

Open in App
ठळक मुद्देशामी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणार आहे. त्याने आता संघाबरोबर सरावाला सुरुवात केली आणि सराव करत असतानाचा फोटो पहिल्यांदाच समाजमाध्यमांवर पोस्ट केला.

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आयपीएलच्या सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शामी हा आपली पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमुळे व्यथित होता. या आरोपांमुळे त्याची कारकिर्द संपणार, असे काही जणांना वाटले होते. पण शामी या साऱ्यातून बाहेर पडला असून तो आयपीएलच्या व्यासपीठावर परतला आहे.

हसीनने, शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला , असा आरोपही हसीनने केला होता. हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर बीसीसीआयने शामीला कारारातून वगळले होते. पण बीसीसीआयच्या एका समितीने शामीची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला करारात सामील करून घेण्यात आले. त्याचबरोबर आयपीएलचे दालनही त्याच्यासाठी खुले करण्यात आले.

शामी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणार आहे. त्याने आता संघाबरोबर सरावाला सुरुवात केली आणि सराव करत असतानाचा फोटो पहिल्यांदाच समाजमाध्यमांवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, " क्रिकेटच्या मैदानात मी परतलो आहे. आतापर्यंत तुम्ही ज्यापद्धतीने माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीलात, त्याबद्दल धन्यवाद. "

टॅग्स :आयपीएल 2018मोहम्मद शामी