Join us

लोकेश राहुलने ठोकले आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक

या खेळीदरम्यान राहुलने चार गगनचुंबी षटकार आणि सहा चौकर लगावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 20:23 IST

Open in App

मोहाली -  के. एल राहुलने दिल्लीबरोबर सुरु असलेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकलं आहे. राहुलनं 14 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. या खेळीदरम्यान राहुलने चार गगनचुंबी षटकार आणि सहा चौकर लगावले. राहुलच्या या फटकेबाजीच्या बळावर पंजाबने तीन षटकांमध्ये आपले अर्धशतक फलकावर लगावले होते. राहुलने बाद होण्यापूर्वी 16 चेंडूत 51 धावांची धमाकेदार खेळी केली होती. 

किंग्ज इलेव्हनचा सलामीवीर लोकेश राहुलने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. त्याने हे अर्धशतक आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध १४ चेंडूंत ठोकले. या खेळीने त्याने याआधीचा युसूफ पठाण व सुनील नारायण यांचा विक्रम मोडला. या दोघांनी प्रत्येकी १५ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. लोकेश राहुलने त्याच्या या वादळी खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्याने ट्रेंट बोल्टच्या षटकात एक षटकार आणि २ चौकार मारले व नंतर शमीच्या तीन चेंडूंत त्याने एक षटकार, एक चौकार आणि एकेरी धाव घेतली. त्यानंतर त्याने अमित मिश्राच्या एकाच षटकात २ षटकार व ३ चौकार ठोकले. या षटकात राहुलने तब्बल २४ धावा ठोकल्या.

लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्या बळावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ६ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले.

आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतके ठोकणारे फलंदाजलोकेश राहुल (१४ चेंडू). किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आयपीएल २0१८)सुनील नरेन (१५ चेंडू) : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरू (आयपीएल २0१७).युसूफ पठाण (१५ चेंडू). कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद (आयपीएल २0१४).

टॅग्स :आयपीएल 2018लोकेश राहुल