Join us

लोकेश राहुलच्या खेळीवर पाकिस्तानी महिला अँकर झाली फिदा

क्रिकेटची चाहती असलेल्या जैनब अब्बासने राहुलच्या खेळीनंतर टिट्व करत प्रतिक्रिया दिली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 14:11 IST

Open in App

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये चार अर्धशतकासह ऑरेंज कॅप पटकवणाऱ्या राहुलच्या खेळीमुळं पंजाब संघ प्ले ऑफकडे वाटचाल करत आहेत. त्याच्या या दमदार फंलदाजीवर पाकिस्तानची अँकर फिदा झाली आहे. जैनब अब्बास असे पाकिस्तानी महिला पत्रकाराचे नाव आहे. क्रिकेटची चाहती असलेल्या जैनब अब्बासने राहुलच्या खेळीनंतर टिट्व करत प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत म्हटलं की, लोकेश राहुल प्रभावी, शानदार टायमिंग, पाहण्यात मजा आली.

जैनबच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने आपली मते व्यक्त केली आहेत.

 

 

 

 

 

भारत-पाकिस्तानमधील नाजूक संबंधांमुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. तरी देखील जैनबने राहुलच्या या खेळीचं कौतूक केलं. लोकेश राहुलने आतापर्यंत या सत्रात झालेल्या दहा सामन्यात दोन वेळा नाबाद राहत 53.75 च्या सरासरीने 471 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे. या सत्रात राहुलने चार अर्धशतके झळकावली आहेत. 

 

  

टॅग्स :आयपीएल 2018