Join us  

IPL 2018 : सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी केन विल्यमसन

धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर फलंदाजीवर त्याचा परिणाम होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 2:38 PM

Open in App
ठळक मुद्देवॉर्नरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवनचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वार्नरला आयपीएलमधून निलंबित केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार कोण होणार, अशी चर्चा सुरु होती. पण हैदराबादच्या संघव्यवस्थापनाने या चर्चेा पूर्णविराम दिला आहे. हैदराबादच्या संघाची कमान आता इंग्लंडच्या केन विल्यमसनच्या हाती सोपवण्यात आली आहे.

चेंडूशी छेडछाड केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने वॉर्नरवर कारवाई केली होती. त्यानंतर प्रथम वॉर्नरला हैदराबादचे कर्णधारपद सोडावे लागले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आयपीएलमधून खेळण्यासाठी बंदी घातली होती.

वॉर्नरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवनचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते. पण धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर त्याच्यावर अधिक दडपण येईल. या सर्व गोष्टीचा त्याचा परिणाम फलंदाजीवर होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. त्यामुळे त्यांनी कर्णधारपदासाठी विल्यम्सनला पसंती दिली असावी.

टॅग्स :आयपीएल 2018डेव्हिड वॉर्नरशिखर धवन