Join us

IPL 2018: केदार जाधव आयपीएलमधून बाहेर, चेन्नईला मोठा झटका

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत चौकार मारत  चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 18:39 IST

Open in App
ठळक मुद्देकेदारला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याला जवळपास दीड ते दोन महिने खेळता येणार नाही.

चेन्नई : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत चौकार मारत  चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत तो खेळणार नसल्याने चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईविरुद्धच्या सलामीच्या लढतीत केदार चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. पण स्नायूंच्या दिखापतींमुळे तो जखमी निवृत्त झाला होता. पण जेव्हा चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो बाद झाला, त्यानंतर अखेरच्या षटकात केदार फलंदाजीला आला होता. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

केदारला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याला जवळपास दीड ते दोन महिने खेळता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलला त्याला मुकावे लागणार आहे.

टॅग्स :आयपीएल 2018