Join us

IPL 2018 : चेन्नईच्या यशाचे गुपित जडेजाने केले जाहीर; धोनीच्या विजयाचा मंत्र जाणून घ्या...

धोनीच्या या नेतृत्वाच्या यशामागचे गुपित नेमके काय, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. त्याचे हे गुपित जाहीर केले आहे चेन्नईचाच खेळाडू रवींद्र जडेजाने.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 18:14 IST

Open in App
ठळक मुद्देआतापर्यंतच्या दहा सामन्यांमध्ये चेन्नईने सात सामने जिंकत 14 गुण पटकावले आहेत.

 नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी म्हटल्यावर चाणाक्ष कर्णधार, हे शब्द आपसूकच येतात. कारण त्याची नेतृत्व करण्याची पद्धत फार निराळी आहे. त्याने भारतीय संघाला आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाला आपल्या नेतृत्वाच्या जोरावर बरेच विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे धोनीच्या या नेतृत्वाच्या यशामागचे गुपित नेमके काय, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. त्याचे हे गुपित जाहीर केले आहे चेन्नईचाच खेळाडू रवींद्र जडेजाने.

धोनीच्या विजयाचा मंत्रच जडेजाने जाहीर केला आहे. याबाबत जडेजा म्हणाला की, " धोनी नेहमी आम्हाला सांगत असतो की, आपण जिंकणारही एकत्र आणि हरणारही एकत्र.  धोनी कधीही कोणत्या खेळाडूवर पराभवाचे खापर फोडत नाही. त्याचबरोबर तो संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवतो. सामन्याचा निकाल जो काही असेल त्याचा आपण सारे एकत्र मिळून सामना करायचा, असे धोनी सांगत असतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोणतेही दडपण जाणवत नाही. "

सध्याच्या घडीला धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने दमदार कामगिरी करत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या दहा सामन्यांमध्ये चेन्नईने सात सामने जिंकत 14 गुण पटकावले आहेत. चेन्नई चांगल्या फॉर्मात दिसत असून त्याचे एक कारण दस्तुरखुद्द धोनीही आहे. कारण आतापर्यंतच्या दहा सामन्यांमध्ये जवळपास 90च्या सरासरीने धोनीने 360 धावा केल्या आहेत, यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.

धोनीच्या यशाचे रहस्य उलगडताना जडेजा म्हणतो की, " धोनीने नेहमीच खेळाडू जपले आहेत. तो प्रत्येक खेळाडूचा आदर करतो. त्यांच्या गुणवत्तेला न्याय देतो. आपण कामगिरी कशी करू शकतो, याबद्दलही तो मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला खेळायला मिळावे, अशीच बऱ्याच खेळाडूंची इच्छा असते. "

टॅग्स :विराट कोहलीरवींद्र जडेजाआयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स