Join us

IPL 2018 : पुण्यातील दोन्ही ' प्ले ऑफ ' चे सामने कोलकात्याला होणार

आयपीएलमधील एलिमिनेटरचा सामना 23 मे रोजी पुण्यात होणार होता. त्याचबरोबर क्वालिफायर-2 हा सामना 25 मे रोजी पुण्यातच खेळवण्यात येणार होता. पण आता हे दोन्ही सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 17:52 IST

Open in App
ठळक मुद्देपुण्याच्या मैदानापेक्षा कोलकात्याच्या इडन गार्डन्सची प्रेक्षक क्षमता जास्त आहे. बाद फेरीचा आनंद जास्त चाहत्यांना घेता यावा, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : आयपीएलचे दोन  ' प्ले ऑफ ' चे सामने पुण्यामध्ये खेळवण्याचे ठरवले होते. पण आईपीएल संचालन परिषदने मात्र यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार आयपीएलचे  दोन्ही ' प्ले ऑफ ' चे सामने आता कोलकात्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.

आयपीएलमधील एलिमिनेटरचा सामना 23 मे रोजी पुण्यात होणार होता. त्याचबरोबर क्वालिफायर-2 हा सामना 25 मे रोजी पुण्यातच खेळवण्यात येणार होता. पण आता हे दोन्ही सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. पण क्वालिफायर-1 आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे.

आईपीएल संचालन परिषदचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत सांगितले की, " पुण्याला होणारे एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 हे दोन्ही सामने आता कोलकात्याला हलवण्यात आले आहेत. " 

पुण्याचे सामने कोलकात्याला का हलवले....कावेनी नदीच्या पाणी वाटपाने चेन्नईमध्ये उग्र रुप धारण केले होते. आंदोलकांनी आयपीएलचे सामने चेन्नईत होऊ देणार नाही, अशी धमकिही दिली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे सामने पुण्याला हलवण्यात आले होते. आता पुण्याला चेन्नईचे बरेच सामने झाले आहेत. पुण्याच्या मैदानापेक्षा कोलकात्याच्या इडन गार्डन्सची प्रेक्षक क्षमता जास्त आहे. बाद फेरीचा आनंद जास्त चाहत्यांना घेता यावा, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स